भारतातील पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैय्या यांचे निधन

भारतातील पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैय्या यांचे निधन

भारतासाठी पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ठरलेल्या भानू अथैय्या यांचे निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथैय्या यांना १९८३ साली ‘गांधी’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. वेषभूषाकार भानू अथैय्या यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाल्याची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच यात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांनी देखील काही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु हा चित्रपट बेन किंग्सले यांचा जबरदस्त अभिनय आणि भानु अथैया यांच्या वेशभूषेमुळे विशेष गाजला. याच चित्रपटातील वेशभूषेकरता त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा –

अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश न केल्याने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा दणका

First Published on: October 15, 2020 6:26 PM
Exit mobile version