Akshay Kumar शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Akshay Kumar शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Akshay Kumar शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) हा सध्याच्या बॉलिवूडमधील सर्वांत व्यस्त अभिनेता आहे असे म्हटले जात आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत आहे मात्र अक्षय कुमार त्याचे काम काही थांबवणार नाहीये. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अक्षयने २०० हून अधिक कलाकार  आणि क्रू मेंबर्सना घेऊन बेल बॉटम (Bell bottom)   या सिनेमाचे शेड्यूल पूर्ण केले होते. या सिनेमाचे शुटींग ब्रिटेनमध्ये करण्यात आले होते. बेल बॉटम हा सिनेमा दुसऱ्या लाटेनंतर सिनेमागृहात हीट झालेला हा पहिला सिनेमा ठरला होता. त्यावेळी देखील सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू होती. अक्षय कुमार आला पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. कारण अक्षय कुमार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्याच्या आगामी राम सेतू (Ram Setu)  या सिनेमाचा एक सीक्वेन्स शूट करणार असल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय कुमारच्या आगामी काळात पृथ्वीराज, रक्षा बंधन, राम सेतू, बच्चन पांडे आणि मिशन सिंड्रेला हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सर्व सिनेमांचे शुटींग होणे बाकी आहे. मात्र सध्या संपूर्ण देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. या काळात अक्षय कुमार राम सेतू या सिनेमाचा एक अंडर वॉटर सीक्वेन्सचे शूटींग पूर्ण करणार आहे. हे शूट करण्यासाठी इंटरनॅशनल टीम बोलावण्यात आली आहे. हे शूट जवळपास एक महिना चालेले असे सांगितले जात आहे. संपूर्ण शुटींग हे मुंबईत करण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला आहे.

श्रीलंकेत होणार होती शुटींग

राम सेतू सिनेमाचा हा अंडर वॉटर सीक्वेन्स याआधी श्रीलंकेत शूट केला जाणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे श्रीलंकेत जाण्यास परवानगी नाही. सिनेमात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यासह इतर कलाकारांचे शुटींग ऊटी येथे प्लॅन करण्यात आले होते. मात्र आता हे शुटींग दीव दमण लोकेशनवर फायनल करण्यात आले आहे. त्यातील काही शॉट्स हे मुंबईतील शुट केले जाणार आहेत.


हेही वाचा – Mumbai Special Pavbhaji: भयंकर अंडरवर्ल्ड क्राईम थ्रिलर ‘मुंबई स्पेशल पावभाजी’

 

First Published on: January 11, 2022 10:16 PM
Exit mobile version