इरफान खानचे स्वप्न राहिले अधुरे, वाचा कोणते?

इरफान खानचे स्वप्न राहिले अधुरे, वाचा कोणते?

इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे आज वयाच्या ५३ व्या वर्षीय निधन झाले. मात्र, इरफान खानने आपल्या शानदार अभिनयाने संपूर्ण जगभरात आपला ठसा उमटविला आणि एक वेगळे स्थान मिळवले. कारण इरफान खान हा असा एक स्टार होता ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्यामुळे सर्वांनीच त्याच्या अभिनयावर आणि त्याच्यावर खूप प्रेम केले. दरम्यान, त्यांनी एका मुलाखतीत त्याची एक आवड आणि एक स्वप्न सांगितले होते. मात्र, त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले.

आवडता खेळ

इरफानने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला पतंग उडवण्याची प्रचंड आवडत आहे. मी माझ्या बालपणी पतंग फार उडवायचो. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी पतंग उडवायचो. हे पतंग उडवताना एक वेगळीच मज्जा यायची. पंतग उडताना पाहून आपण हवेमध्ये आहोत आणि आकाशामध्ये पोहत आहोत, असे वाटायचे. संक्रांतीच्या दिवशी माझा मांजाने हात कापला ही घटना अजूनही मला आठवते. कारण यावरुन मला माझी आई खूप ओरडली होती. मात्र, तरी देखील मला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी पतंग उडवायचो. पतंग उडवणे मी कधीच बंद नव्हते केले’.

हे स्वप्न अधुरे राहिले

‘मला क्रिकेट खेळायला देखील आवडायचे. मी कधीकधी स्वप्न पाहायचो की मी कधीतरी भारताकडून क्रिकेट खेळाव. मात्र, ते आतापर्यंत शक्य झाले नाही’ आणि इरफान खानचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.


हेही वाचा – #RIPIrfan: इरफान खान बालपणी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांची करत असत नकल


First Published on: April 29, 2020 6:54 PM
Exit mobile version