मराठमोळ्या सचिन कारंडेचा ‘जॅक अँड दिल’

मराठमोळ्या सचिन कारंडेचा ‘जॅक अँड दिल’

अरबाज खान आणि सचिन कारंडे

बॉलीवूडमध्ये सध्या मराठी टक्का खूप जोमात आहे. कलाकारांसोबत हिंदी सिने जगतात मराठी दिग्दर्शकांची फळी खुप जोमाने काम करत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्वच वयाने तरुण आहेत आणि त्यांच्यासोबत बॉलीवूडकर काम करतांना खुश आहेत. असाच मराठमोळा हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन कारंडे एक नवीन प्रोजेक्ट ‘जॅक अँड दिल’ घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहेत.

बॉलीवूडमधील चौथा चित्रपट 

मूळचे महाराष्ट्रातील अकलूजचे राहणारे सचिन कारंडे यांनी पुण्याच्या ललित केंद्रातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली. त्यांनतर मुंबईत आल्यावर त्यांनी सुरुवातच हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाने केली. ‘पे बॅक’, ‘विकल्प’, ‘कोटा जंक्शन’ आणि आता ‘जॅक अँड दिल’ हा त्याच्या दिग्दर्शनातील हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. लग्नानंतर नवरा-बायकोमधले प्रेम का कमी होते?, लग्नानंतर जबाबदाऱ्या, आपली प्राधान्य का वेगळी होतात? याचा शोध घेणारा सिनेमा असल्याचे सचिन सांगतात. या सिनेमामध्ये अमित साध, अरबाज खान, सोनाल चौहान, एवलिन शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत.

व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यांच्यामधला तोल सांभाळता आलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यावेळी लग्नानंतर नवरा पैसे कमवण्याच्या इतका मागे की त्याला बायकोसाठी एक साधा रविवार देणे ही कठीण होते अशा परिस्थितीत प्रॉब्लेम चालू होतात. मग हे असं का होतं? हाच धागा पकडून बनवलेला हा सिनेमा आहे.
– सचिन कारंडे, दिग्दर्शक

पतीपत्नीच्या नात्याची गोष्ट 

या सिनेमातील जॅक म्हणजेच अमित साध हा एका डिक्टेटिव्हच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, तर अरबाज खान याने वालीयाची भूमिका साकारली आहे. सोनाल चौहान हिने वालियाच्या बायकोची भूमिका साकारली आहे. अरबाज खान आणि सोनाल चौहान यांचे ३ वर्षापूर्वी लग्न होते आणि अरबाज त्याच्या कामामध्ये इतका व्यस्त होतो की त्याला आपल्या बायकोकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतर त्याला आपल्या बायकोवर संशय यायला लागतो की तिचं बाहेर कुठे प्रेमप्रकरण आहे का. ती सारखी घराबाहेर का राहते? हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतानाच त्याला अमित साध हा एक वेडा, ज्याचं कशातच लक्ष नसतं पण त्याला अशी हेरगिरी करण्याची खूप हौस असते, अशा व्यक्तीशी गाठ पडते. मग अरबाज त्याला पाच दिवसांसाठी आपल्या पत्नीच्या मागावर पाठवतो. कशा प्रकारे याचा छडा लागतो हे प्रेक्षकांना २ नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर पाहता येणार आहे.

First Published on: October 18, 2018 3:43 PM
Exit mobile version