Jamai2.O: निया शर्मा आणि रवि दुबेचा अंडरवॉटर लिप लॉक, नेटकऱ्यांची टिझरला पसंती

Jamai2.O: निया शर्मा आणि रवि दुबेचा अंडरवॉटर लिप लॉक, नेटकऱ्यांची टिझरला पसंती

Jamai2.O: निया शर्मा आणि रवि दुबेचा अंडरवॉटर लिप लॉक, नेटकऱ्यांची टिझरला पसंती

जमाई राजा फेम निया शर्मा आणि रवि दुबे ही जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. पुन्हा एकदा वेगळ्या आणि दमदार भुमिकेत प्रेक्षकांना ही जोडी पहायला मिळणार आहे. जमाई 2.O मध्ये हे दोन्ही कलाकार एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहेत. या वेब सिरिजचा टिझर नुकताच रिलिज करण्यात आला आहे. प्रेम आणि बदला अशी कथा असलेल्या या वेब सिरिजमध्ये निया शर्मा आणि रवि दुबे यांना पाहून प्रेक्षकही चकीत होतील असे सीन दिले आहेत. दोघांचाही बोल्ड अंदाज या वेब सिरिजमधून पहायला मिळत आहे. वेब सिरिजच्या टिझरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या वेब सिरिजमध्ये निया आणि रवि दुबे यांचा अंडरवॉटर लिप लॉक करताना दिसत आहे. या सीनमुळे दोघांचीही चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. दोघांचे अनेक बोल्ड सीन्सही या टिझरमधून समोर येत आहेत. लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. टिझरमधून निया आणि रवि यांच्या भन्नाट भुमिका समोर येत आहेत त्यामुळे संपूर्ण वेब सिरिज कशी असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

प्रेम आणि बदला यावर आधारित या सिरिजची कथा आहे. येत्या २६ फेब्रुवारीला ही वेब सिरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. निया आणि रवि या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरुन वेब सिरिजचा टिझर शेअर केला आहे. या वेब सिरिजचे काही शुटींग गोव्यात करण्यात आले आहे. जमाई राजा ही वेब सिरिज खूप हिट झाली होती. आता त्याचा दुसरा भागही तितकाच प्रेक्षकांना आवडेल अशी आहे.


हेही वाचा – अनिता भाभीच्या भूमिकेत नेहाची हॉट एंट्री

First Published on: January 26, 2021 8:19 PM
Exit mobile version