जान्हवीला फाळके पुरस्कार; साडीतील पेहरावामुळे सर्वांना झाली श्रीदेवीची आठवण

जान्हवीला फाळके पुरस्कार; साडीतील पेहरावामुळे सर्वांना झाली श्रीदेवीची आठवण

मुंबईमध्ये शनिवारी दादा साहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Excellence Awards 2019) सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेत्री श्री देवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर सोबत अनेक कलाकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी जान्हवी कपूरला धडक या चित्रपटाकरिता उत्कृष्ट महिला पदार्पण यासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

दादा साहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Excellence Awards 2019) सोहळ्याचे औचित्य साधत जान्हवी कपूरने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या पारंपारिक पेहरावात सर्व उपस्थितांना श्री देवींची आठवण झाली. जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वीपासूनच चर्चेत होती. श्री देवींच्या निधनानंतर जान्हवीने स्वतःला सावरत आपले करिअर पुढे चालू ठेवले.

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांशिवाय आपल्या लूक आणि आऊटफीट वरून नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. संधी मिळताच जान्हवी साडी नेसणं पसंत करते.

या दरम्यान, जान्हवी कपूर सोबत अभिनेत्री ईशान खट्टर हिला देखील दादा साहेब फाळके उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. यावेळी ईशान आणि जान्हवी कपूर या सोहळ्याचा आनंद घेताना दिसले.

भारतीय चित्रपटात महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळकेंच्या नावाने प्रदान करण्यात येतो. १९६९ पासून भारत सरकारकडून हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. हा पुरस्कार भारतीय सिनेसृष्टीत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कलाकारांना दिला जातो.

First Published on: April 22, 2019 2:02 PM
Exit mobile version