मुंबईच्या पावसात जान्हवी आणि ईशानची मस्ती

मुंबईच्या पावसात जान्हवी आणि ईशानची मस्ती

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर

गेले तीन दिवस मुंबईच्या पावसानं मुंबईकरांना अक्षरशः हैराण करून सोडलं आहे. रस्त्यावरच नाही तर रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचून लोकांची त्रेधातिरपीट पावसानं उडवून दिली. मात्र, ‘धडक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरनं या पावसाची मजा लुटली आहे. ईशान आणि जान्हवीचा ‘धडक’ लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. जिथे मुंबईत जागोजागी भरलेल्या पाण्यामुळं लोकांना त्रास होता, तिथे मात्र जान्हवी आणि ईशाननं प्रमोशनच्या वेळी पावसाची मजा घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जान्हवी आणि ईशानचा व्हिडिओ झाला व्हायरल

एका एमएफ चॅनेलमध्ये प्रमोशनसाठी ईशान आणि जान्हवी इतक्या पावसातही वेळेवर पोचले. इतक्या ट्रॅफिकमधून आल्यानंतरही दोघांचा मस्तीचा मूड होता. रेडिओ चॅनेलला पोचताना जान्हवी आणि ईशाननं छत्री उडवून देत धमाल डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सध्या याच व्हिडिओची चर्चा आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ हा चित्रपच २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, जान्हवी कपूरचा हा डेब्यू चित्रपट असून प्रेक्षकांच्या तिच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. श्रीदेवीची मुलगी असल्यामुळं जान्हवीवर बरंच दडपण असल्याचीदेखील सध्या चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच जान्हवी आपले वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर यांच्याबरोबर ‘धडक’च्या यशासाठी तिरूपतीचं दर्शन घेऊन आल्याचे फोटो व्हायरल झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच जान्हवी नक्की आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का? हे सिद्ध होईल.

First Published on: July 11, 2018 1:07 PM
Exit mobile version