जान्हवी कपूर करतेय भाजपाचा प्रचार ?

जान्हवी कपूर करतेय भाजपाचा प्रचार ?

जान्हवी कपूर (फाईल फोटो)

बॉलिवूडमध्ये नव्याने आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर अचानक चर्चेत आली आहे. जान्हवी कोणत्या चित्रपटामुळे नाही तर एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरचे एक  ट्विट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. हे ट्वीट तब्बल साडेतीनशेहून अधिकवेळा रि –ट्वीट झालं आहे. तर १५ हजारांवर लाईक्स या ट्वीटला मिळाले आहेत. हे ट्विट बॉलिवूडशी संबंधीत नसून चक्क लोकसभेच्या निवडणूकीवर आधारीत आहे.

काय म्हणाली जान्हवी ट्वीटमध्ये

‘मला राजकारणाची समज नाही. पण देशाला मोदीजींची गरज आहे, हे मला चांगले ठाऊक आहे,’ अशा आशयाचं ट्विट जान्हवीने केलं आहे. आता हे ट्वीट वाचून तुम्हाला वाटेल जान्हवी भाजपा पक्षाचा प्रचार करतेय किंवा ती मोदींचा प्रचार करतेय. पण यातल काहीच जान्हवीने केलेलं नाहीये. कारण जान्हवीचं हे ट्वीटर अकाऊंट फेक आहे. जान्हवी कपूरच्या नावाने बनवण्यात आलेल्या फेक अकाऊंटवरून हे  ट्विट केले गेले होतं.जान्हवी कपूर  ट्विटरवर नाही. सोशल मीडियावर तिचे वेरिफाईड इन्स्टाग्राम अकाऊंट आहे.  ट्विटरवर मात्र तिचे असे कुठलेही वेरिफाईड अकाऊंट नाही.

निवडणूक काळात खोट्या अकाऊंटला ऊत

निवडणूक काळात सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट तयार होत असतात. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा एक जुना फोटो एडिट करून, ते भाजपाचा प्रचार करत आहेत, असं भासवण्यात आलं होतं. अर्थात नंतर हा फोटो फोटोशॉप्ड असल्याचे लक्षात आलं.

First Published on: April 18, 2019 7:55 PM
Exit mobile version