Video: जान्हवी कपूर झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Video: जान्हवी कपूर झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी हे त्याच्या चाहत्यांचे स्टाईल आयकॉन असतात. त्यांची स्टाईल, त्यांची फॅशन तसेच त्यांच्या अदा चाहते फॉलो करत असतात. मात्र याच सेलिब्रिटींपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. जान्हवीला ट्रोल करण्याचे कारण ऐकून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

सध्या जान्हवीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले ते तिच्या कपड्यांवरून. जान्हवीने घातलेल्या नव्या ड्रेसला असणाऱ्या प्राईज टॅग काढायला चुकीने विसरली आहे. जान्हवीची ही लहानशी चूक मीडियाने आपल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद केला आहे. माध्यमांनी काढलेल्या या फोटोमुळे सोशल मीडियावर जान्हवीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ फोटोग्राफरने viralbhayani ने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या कारच्या दिशेने जात असतांना सगळ्यांची नजर तिच्या ड्रेसच्या मागच्या बाजूला पडल्यावर तिच्या ओढणीला लटकलेल्या प्राईज टॅगवर जाते.

जान्हवी कशी तिच्या ड्रेसचा टॅग काढायला विसरू शकते, यासाठी नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले असून जान्हवीची खिल्ली उडवली आहे.

अशी केल्या कमेंट


‘ही’ अभिनेत्री समुद्र किनारी घेतेय सुट्टीची मज्जा; फोटो व्हायरल
First Published on: October 23, 2019 5:28 PM
Exit mobile version