Video: जान्हवी कपूरचे ‘बालाजीला’ साकडे!

Video: जान्हवी कपूरचे ‘बालाजीला’ साकडे!

जान्हवी कपूर- बोनी कपूर आणि खुशी कपूरसोबत बालाजी मंदिरात

सध्या ‘धडक’ या सिनेमाची जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा आहे सिनेमातील मुख्य कलाकार जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची. जान्हवीचा हा पहिलाच सिनेमा असून ट्रेलर रिलीजनंतर दोघांच्याही अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. एखादी नवं काम सुरु करण्याआधी किंवा सुरु केलेलं काम सुरळीत पार पडावं यासाठी बहुतांशी लोक देवाला साकडं घालतात. आमचं काम सुरळीत पार पडूदे.. अशी देवाकडे प्रार्थना करतात. धडक सिनेमाची हिरोईन जाव्हवी कपूरनेही अशाचप्रकारे देवाला साकडं घातलं आहे. नुकतीच जान्हवी तिचे वडील बोनी कपूर आणि बहिण खुशी कपूर यांच्यासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला गेली होती. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडाओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘धडक’ सिनेमाला भरपूर यश मिळावे यासाठी जान्हवीने तिरुपती बालाजीला साकडं घातल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे.

पाहा व्हिडिओ :

व्हिडिओ सौजन्य- spreadtirupati/instagram


‘देवा मला पाव…’

धडक सिनेमा येत्या २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. धडक हा जान्हवीचा डेब्यू सिनेमा आहे. सिनेमाच्या निमित्ताने ती प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान जान्हवी म्हणाली होती की, ”मी ‘धडक’साठी जितकी उत्सुक आणि आतूर आहे तितकंच मला त्याचं दडपण आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी म्हणून लोकांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. यामुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.” अशातच प्रदर्शनाला काही दिवस शिल्लक असताना जान्हवीने बालाजी मंदिरात हजेरी लावल्यामुळे, नक्कीच तिने धडकच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं बोललं जात आहे. इन्स्टाग्रामवर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून जान्हवीचे चाहते तिला धडक सिनेमासाठी भरभरुन शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे पारंपारिक वेशात दिसलेल्या कपूर सिस्टर्सच्या पेहरावाचीही चर्चा होते आहे.

जान्हवी आणि इशानची केमिस्ट्री

जान्हवी आणि इशानची केमिस्ट्री सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील सीन पाहताना प्रत्येक सीनमध्ये ‘सैराट’ची झलक मिळते असून त्याचं संगीतदेखील मराठी चित्रपटाचीच आठवण करून देतं. झिंगाट गाण्याचे संगीत असो अथवा त्यातील कोरिओग्राफी सर्व काही सारखंच आहे. आर्चीच्या भूमिकेतील जान्हवी आणि परश्याच्या भूमिकेतील इशानच्या तोंडी जरी राजस्थानी संवाद असले तरीही ही जोडी प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

First Published on: July 10, 2018 11:16 AM
Exit mobile version