कंगना सीएसटी स्टेशनवर रेल्वेची तिकीट विकतेय!

कंगना सीएसटी स्टेशनवर रेल्वेची तिकीट विकतेय!

कंगनाने विकली तिकीट

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सध्या आपल्या आगामी पंगा चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनसाठी वाट्टेल ते असं म्हणत कंगना आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकीट विकताना दिसली. यावेळी सगळ्यांच लक्ष कंगनाने वेधून घेतलं. यावेळी कंगनाच्या लूकची ही चर्चा झाली. अगदी सरवल्या सारखी कंगना तिकीट ऑफिसमध्ये वावरत होती.

आजच पंगा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. कंगनाच्या चाहत्यांना तीच्या पंगाच्या ट्रेलरची आतुरता होती. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे.

कबड्डीपटूच्या जीवनावर सिनेमा आधारीत

पंगा या सिनेमात कंगना जया निगम ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एका कबड्डीपटूच्या जीवनावर हा सिनेमा आधारीत आहे. ‘पंगा’मध्ये कंगनासोबत जस्सी गिल, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, रिचा चड्ढाही आहेत. या सिनेमाचे पोस्टर याआधीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यात कंगना अगदी साध्या लुकमध्ये दिसते. तर इतर कलाकारांचे लूक ही साधेसेच आहेत. पण पोस्टरमधील जस्सी गिलचा लूक काहीसा वेगळा आहे.

२०२० हे वर्ष कंगनासाठी खास ठरणार आहे. कंगना पंगा बरोबरच धाकड आणि थलायवी हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लायवी’ हा सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. तर ‘धाकड’ सिनेमा हा पूर्ण एण्टरटेनमेन्ट करणारा आहे.

First Published on: December 23, 2019 7:32 PM
Exit mobile version