लग्नाआधी ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री झाली आई!

लग्नाआधी ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री झाली आई!

लग्नाआधी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री झाली आई!

सोशल मीडियावर ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे नेहमीचं चर्चेत असते. मात्र काही दिवसांपासून ही  बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधी गर्भवती असल्यामुळे चांगलीच चर्चेत होती. या अभिनेत्रीचं नावं आहे कल्की कोचलिन. कल्की गर्भवती असल्याच्या दरम्यान तिचे बेबी बंम्प फ्लॉन्टचे फोटो चांगलचे व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर कल्कीने मुलगी झाल्याची माहिती दिली. तिने मुलीचे देखील नावं जाहीर केलं असून तिने आई झाल्यामुळे सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली आहे. ‘सॅफोचं स्वागत. सॅफो माझ्या गर्भशयामध्ये ९ महिने एका मोमोजसारखी होती. आता तिला तिची जागा द्यायला हवी. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जेबद्दल सर्वांचे आभार. यासह ज्या महिला मुलांना जन्म देतात, मग ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिजर डिलिव्हरी या सर्वांचा मला आदर वाटतो. आपण अशा महिलांना आधार दिला पाहिजे तसंच त्यांना क्रेडिट देखील दिलं पाहिजे’, अशाप्रकारे कल्कीने पोस्ट केलं आहे.

जेव्हा कल्की गर्भवती होती तेव्हा ती असं म्हणाली की, वॉटर बर्थच्या साहाय्याने ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. आता कल्कीने वॉटर बर्थच्या साहाय्याने मुलीला जन्म दिला आहे की नाही हे अजून समोर आलं नाही आहे.

कल्कीचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अजून देखील या दोघांनी लग्न केलं नाही आहे. जेव्हा तिला लग्नाबाबत विचारलं तर ती म्हणाली की, गर्भवती असल्याच्या कारणामुळे ती लग्नाची घाई करत नाही आहे. मी लग्न करण्याच्या विरोधात नाही आहे. आम्ही लग्न करण्यास इच्छूक आहोत. पण आता ही लग्न करण्याची वेळ नाही आहे.


हेही वाचा – VIDEO – तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपटाचा पहिला किसिंग सीन


 

First Published on: February 11, 2020 5:00 PM
Exit mobile version