कंगना रनौतने केलं किली पॉलचं कौतुक

कंगना रनौतने केलं किली पॉलचं कौतुक

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत बऱ्याचदा अनेकांना ट्रोल करताना दिसून येते, परंतु तिने आता चक्क इन्स्टाग्राम स्टार किली पॉलचं कौतुक केलं आहे. कंगनाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किली पॉलचा ‘तुम जो आए’ या गाण्यावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना किली पॉलचं कौतुक करताना दिसत आहे.

कंगनाने किली पॉलचं केलं भरभरून कौतुक


किली पॉलचा हा व्हिडीओ शेअर करत कंगना रनौतने लिहिलं की, किती छान आहे. यासोबतचं तिने लाल हार्टची इमोजी सुद्धा शेअर केली आहे. हा व्हिडीओ कंगनाने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यामध्ये किली पॉल ‘तुम जो आए’ या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसून येत आहे. हे गाणं कंगनाच्या ‘Once Upon a Time in Mumbaai’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अजय देवगन, प्राची देसाई आणि इमरान हाशमीसुद्धा मुख्य भूमिकेत दिसले.

किली पॉल आणि नीमाला ‘राता लंबिया’ गाण्यामुळे मिळाली होती प्रसिद्धी

किली पॉल आणि त्याची बहिण नीमा यांना ‘राता लंबिया’ या गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आवे. त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्याचे भारतीयांनी तोंडभरून कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी सुद्धा केलं होत किली पॉलच कौतुक
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा किली पॉलचं ‘मन की बात’ या कार्यक्रमातून कौतुक केलं होतं. सध्या कंगना रनौत लॉकअप या रियालिटी शोमध्ये दिसून येत आहे. तसेच ती आता लवकरच तेजस, धाकड़ आणि मणिकर्णिका या चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.


 

First Published on: April 7, 2022 4:27 PM
Exit mobile version