Kangana Ranaut : शीख संघटनेच्या तक्रारीनंतर कंगना रनौत आज खार पोलिसांसमोर हजर

Kangana Ranaut : शीख संघटनेच्या तक्रारीनंतर कंगना रनौत आज खार पोलिसांसमोर हजर

Kangana Ranaut : शीख संघटनेच्या तक्रारीनंतर कंगना रनौत आज खार पोलिसांसमोर हजर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईतील खार पोलीस ठाण्यात पोहचली असून ती आपला जबाब नोंदवणार  आहे. शीख समुदायाच्या तक्रारीवरून कंगना विरोधात खार पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम २९५-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील जबाब नोंदवण्यासाठीच कंगना खार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

दिल्लीच्या सीमेरेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंनगाने गंभीर टीका केली होती. या टीकेदरम्यान तिने शेतकरी आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी जोडला होता. यामुळे संतप्त शीख संघटनांनी मागील महिन्यात खार कंगनाविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा तक्रार दाखल केला.

याप्रकरणी खार पोलिसांनी डिसेंबरच्या सुरुवातीला कंगनाला चौकशीला हजार राहण्याची नोटीस बजावली होती. यावेळी कंगनाच्या वकीलाने ती २२ डिसेंबर रोजी पोलिसांच्या चौकशीसाठी उपस्थित असे कोर्टापुढे सांगितले. यानंतर बुधवारी कंगनाच्या वकिलाने पुन्हा तिला इतर दिवशी हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

शीख संघटनेच्या तक्रारीविरोधात कंगनाने हायकोर्टात धाव घेतली. यावेळी कंगनाविरोधात २ जानेवारी २०२२ पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले.

कंगनाने सोशल मीडियावर दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे म्हटले होते. या शेतकरी आंदोलनात पंजाबमधील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे कंगनाने केलेल्या विधानामुळे संतप्त झालेल्या शीख संघटनांनी कंगनाविरोधात गुन्हा दाखल केला.


अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा झाला अपघात, नोराच्या ड्रायव्हरला जमावाने घेरलं


First Published on: December 23, 2021 1:47 PM
Exit mobile version