‘थलाइवी’चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर भडकली कंगना, म्हणाली…

‘थलाइवी’चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर भडकली कंगना, म्हणाली…

'थलायवी'चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर कंगनाचा संताप, म्हणाली....

बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित ‘थलायवी’ हा चित्रपट १० सप्टेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भूमिका निभावली आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे सर्वाधिक कौतुक केले जातेय. त्यामुळे कंगनाने चाहत्यांना धन्यवाद म्हटले आहे. एकीकडे चित्रपटाच्या यशाच्या आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे कंगना ‘थलायवी’चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर चांगलीच भडकली आहे. कौतुक न करणाऱ्या कलाकारांना ‘बॉलिवूडचे माफिया’ असे म्हणत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने नुकतचं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, खूप कमी चित्रपट असतात ज्यांना इतक्या उत्साहाने आणि एकमताने पसंत केले जाते. थलायवी यातीलच एक चित्रपट आहे. मला आनंद आहे की, लोकांनी थलायवीतून डॉ. जयललिता यांनी जाणून घेण्याची संधी दिली. हा चित्रपट बनवणाऱ्या सर्व टीमचे मी आभार मानू इच्छिते कारण या चित्रपटात मी एका हिऱ्याप्रमाणे चमकतेय.

‘थलायवी’चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर कंगनाचा संताप, म्हणाली….

तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये कंगनाने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. यात तिने लिहिले की, ‘तर दुसरीकडे मी बॉलिवूड माफियांची वाट पाहतेय ज्यांनी राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवावे. कारण मी एका कलेचे कौतुक करण्यापासून कधी मागे हटत नाही. त्यांनी देखील त्यांच्या क्षुल्लक मानवी भावनांच्यावर विचार करत कलेचा विजय होऊ द्या. थलायवी. ‘

थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय यांनी केले आहे. तर केवी विजयेंद्र प्रसाद, मधन कारके आणि रजत अरोरा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन आणि जीशु सेनगुप्तासारख्या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात एमजेआर आणि जयललिता यांची प्रेमकथाही खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कंगना लवकरचं ‘धाकड’ आणि ‘तेजस’ चित्रपटात झळकणार आहे. नुकतचं तिने धाकडचे शूटिंग पूर्ण केले आहे. यासोबतच ती आगामी चित्रपटात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना या चित्रपटातून दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.


 

First Published on: September 29, 2021 4:35 PM
Exit mobile version