कंगनाचा ‘पंगा’, शुटिंगला सरुवात

कंगनाचा ‘पंगा’, शुटिंगला सरुवात

कंगना रनौतच्या 'पंगा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात (फाईल फोटो)

कसा असेल हा ‘पंगा’

कंगनाच्या पंगा चित्रपटाची कथा कबड्डी या खेळावर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाची संपूर्ण गोष्ट उत्तर भारतातील वातावरणामध्ये रंगवली गेली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कंगनाने खास कब्बडी प्रशिक्षणही घेतलं आहे. कंगनाने  १५ दिवसांचं एक कबड्डी वर्कशॉप केल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असल्याची माहिती एका इंग्रजी वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे. दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने दिलेल्या माहितीनुसार, ‘कबड्डी खेळताना श्वासावर नियंत्रण लागतं त्यासाठी योगामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याचा अधिक फायदा होईल असं कंगनाला वाटत आहे. तसंच कंगनाला प्रशिक्षण देण्यासाठी खऱ्या कबड्डी खेळाडूला नेमण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कंगनाला आपल्या शरीरयष्टीमध्ये बराच बदल करावा लागणार आहे आणि त्यासाठी कंगना आनंदाने तयार असल्याचंही अश्विनी यांनी सांगितलं.

‘मणिकर्णिका’साठी प्रेक्षक उत्सुक…

दरम्यान, सध्या कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच मणिकर्णिकाचा ट्रेलर रिलीज झाला होता. कंगना या चित्रपटामध्ये वीरांगना राणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीच्या राणीची भूमिका साकारणार आहे. कंगनाने या चित्रपटातील राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी तिने घोडेस्वारीसोबत तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. या चित्रपटातील बहुतांशी स्टंट तिने स्वत:हून केले आहेत. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा: मोदींना २०१९ साली पुन्हा निवडुन द्या; सांगतेय कंगना

First Published on: November 12, 2018 2:58 PM
Exit mobile version