थलाइवी चित्रपटातील नव्या लूकमुळे कंगना चर्चेत : जयललिता बायोपिक

थलाइवी चित्रपटातील नव्या लूकमुळे कंगना चर्चेत : जयललिता बायोपिक

Kangna ranut: 'अजान'च्या कौतुकाचा कंगनाचा थ्रो बॅक व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले स्वातंत्र्यापूर्वी...

बॉलीवुडमधील कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणावत आता थलाइवी या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. थलाइवी या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासून तिच्या सिनेमातील लूकमुळे ती चर्चेत आहे. आता या चित्रपटातील तिचा एक नवा लूक समोर आला आहे. कंगनाने यात एका शास्त्रीय नृत्यांगनेचा वेश परिधान केलेला दिसतोय.

थलाइवी सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यावर अभिनेत्री कंगना तिच्या लूकमुळे चर्चेत होती. याच दरम्यान तिचा नर्तीकेच्या वेशातील फोटो कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केला आहे. थलाइवी हा जयललिता यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक आहे. ‘टीम कंगना रणावत’ या इंस्टाग्राम अकाउंटला तिच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनासोबत तिची हेअर स्टाइलिस्ट देखील दिसत आहे. मारिया शर्मा असे त्या हेअर स्टाइलिस्टचे नाव असून त्यांनी तब्बल ५० वर्षे सिनेमा सृष्टीत काम केले आहे. हेमा मालिनी, शर्मिला टॅगोर, हेलन आणि मनीषा यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले आहे.

या चित्रपटांमध्ये मारियाने कंगनासोबत केले काम

कंगनाच्या या नव्या लूकमध्ये तिच्या सोबत असणारी मारिया यांना सिनेमासृष्टीतला ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कंगनासोबत ‘वो लम्हे, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी कंगनासोबत काम केले आहे. थलाइव हा सिनेमा येत्या २६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजय यांनी केले आहे व सिनेमाचे प्रोडक्शन शैलेश आर. सिंह यांनी केले आहे.

First Published on: January 30, 2020 8:52 PM
Exit mobile version