Kangana Ranaut: ‘या वर्षात भरपूर प्रेम पत्र मिळू देत’, कंगनाचं राहू-केतूला साकडं

Kangana Ranaut:  ‘या वर्षात भरपूर प्रेम पत्र मिळू देत’, कंगनाचं राहू-केतूला साकडं

Kangana Ranaut: 'या वर्षात भरपूर प्रेम पत्र मिळू देत', कंगनाचं राहू-केतूला साकडं

कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut)  तिच्या नव्या वर्षाची सुरुवात राहू – केतू  (Rahu – Ketu )  मंदिरात दर्शनाने केली. कंगनासाठी मागचे वर्ष तसे काही खास ठरले नाही. अनेक गोष्टींमुळे, कंगनाच्या बेताल वक्तव्यामुळे वर्षभर कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीची शिकार झाली. त्याचप्रमाणे कंगनावर अनेक FIR देखील दाखल करण्यात आल्या. या सगळ्यांतून सुटका करुन घेण्यासाठी कंगनाने नव्या वर्षाची सुरुवात तिरुपती बालाजी ( Tirupati Balaji ) जवळ असलेल्या राहू केतू मंदिरात दर्शन करुन केली. कंगनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने राहू केतूच्या पायाशी तिच्या मनातील सगळ्या इच्छा व्यक्ती केल्यात. कंगनाने राहू केतूकडे काय साकडं घातलं हे तिने तिच्या फॅन्ससोबत देखील शेअर केले.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने कंगनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने असे म्हटले आहे की, ‘जगतील हे एकच राहू केतू मंदिर आहे. जे तिरुपती बालाजी मंदिराजवळ आहे. मी तिथे पूजा केली. पाच लिंगामधील वायु लिंडाची ही स्थापना केली आहे. ही फार आकर्षक जागा’ असल्याचे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने पुढे असे म्हटले आहे की, ‘मी इथे माझ्या प्रिय मित्रांच्या सुरक्षिततेसाठी आले आहे. या वर्षी मला कमी पोलीस तक्रारी, कमी FIR आणि सर्वाधिक प्रेम पत्र मिळू देत. जय राहू केतू जी की’

तिरुपती बालाजी जवळ असलेल्या राहू केतू मंदिरात कंगनाने पूजा केली. पूजा करतानाचे फोटो देखील कंगनाने शेअर केले आहेत. यात कंगना जमिनीवर बसून पूजा करताना दिसताना आहे. देवाच्या पूजेत तन्नील झालेल्या कंगनाला पाहून तिचे फॅन्स देखील चकीत झाले आहेत.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोत ती गायीला चारा भरवताना देखील दिसत आहे. कंगनाने राहू केतूच्या दर्शनाला जाताना पिंक कलरची साडी नेसली होती. त्याचप्रमाणे कपाळवर टिकली अशा साध्या लुकमध्ये कंगना मंदिरात पोहचली. कंगना मागच्या वर्षात तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहिली. कंगनाने सर्वच ठिकाणी तिची मत व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना केला. मात्र नव्या वर्षात कंगनावर राहू केतू प्रसन्न होऊन तिला चांगल वागण्याची बुद्धी देवो अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.


हेही वाचा –  Kangna Ranaut: सैफ अली खान घेतोय तैमूरची शाळा, आता कंगना म्हणते…

First Published on: January 1, 2022 6:20 PM
Exit mobile version