दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार कंगना

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार कंगना

अभिनेत्री कंगना रणौत हिचा मणिकर्णिका चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट झाशीची राणी यांच्या जीवनावर आधारित आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बायापिक बनवल्यानंतर आता नवीन बायोपिक येत आहे. तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील एका मोठे नाव जयललिता यांच्या जीवनावर हा बायोपिक बनणार आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूडची क्विन कंगना रणौतचे नाव समोर आले आहे. चित्रपटामध्ये कंगना ही जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेशक तरण आदर्श यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

असे आहे चित्रपटाचे नाव

या भूमिकेसाठी इतर अभिनेत्रींचे ही नावे समोर आली होती. बॉलिवूड डिव्हा ऐश्वर्या राय आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांना ही भूमिका मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेर ही भूमिका कंगनाला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दाक्षिणात्या चित्रपट दिग्ददर्शक विजय या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘जया’ आणि ‘थलाइवी’ असे ठेवण्यात येणार आहे. हा चित्रपटा हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

First Published on: March 24, 2019 11:13 AM
Exit mobile version