म्हणून थांबली कंगनाच्या चित्रपटाची शुटिंग

म्हणून थांबली कंगनाच्या चित्रपटाची शुटिंग

अभिनेत्री कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट “मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झांसी” चित्रपट सध्या अचडणीत अडकला आहे. कामगार व कनिष्ठ कलाकारांचे पैसे थकवल्याने शुटिंग बंद करण्यात आली आहे. सिने कर्मचारी फेडरेशने सध्या शुटिंगचे काम थांबवल्यामुळे चित्रपटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या कलाकारांचे १.५ कोटी रुपये थकवले असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने या चित्रपटाला राम राम केला होता. तर आणखी एका अभिनेत्रीने हा चित्रपट सोडल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री स्वाती सेमवालनेही हा चित्रपट सोडला होता . या चित्रपटात स्वाती सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीची भूमिका साकारत होती. गेल्या काही दिवसांपासून स्वाती हा चित्रपट सोडणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर स्वातीने आपण चित्रपट सोडल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.

“तीन महिन्याहून अधिक काळ झाला तरीही अजून कामगारांचे पगार मिळाले नाहीत. यात ९० लाख लाईटिंग कर्मचारी, २५ लाख कनिष्ठ कलाकार आणि इतर खर्च ४० लाख इतका आहे. चित्रपटाचे प्रोड्युसर कमाल जैन यांनी ऑक्टोबर महिन्यात पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र, अजूनही पैसे मिळालेले नाहीत. आम्ही पेमेंसाठी सतत जैन यांना फोन करतो मात्र ते फोन उचलत नाहीत. त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे देण्याचे कबुल केले होते. मात्र अजून पैसे दिले नाहीत. त्यामुळे कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” – अशोक दुबे, वेस्टर्न इंडिया सिने कर्मचार्यांच्या फेडरेशनचे सरचिटणीस

चित्रपट आणि कॉन्ट्रोव्हर्सी

चित्रपटाची घोषणा केल्यापासून तो चर्चेचा विषय ठरतोय. चित्रपट अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमध्येदेखील अडकला. सुरूवातीला हा चित्रपट दक्षिणेतले ख्यातनाम दिग्दर्शक क्रिश दिग्दर्शित करत होते. परंतु कंगनाच्या हस्तक्षेपामुळे क्रिश यांनी हा सिनेमा अर्धवट सोडून दिला. त्यानंतर कंगनाने चित्रपटाच्या उरलेल्या भागाचे दिग्दर्शन स्वतः केले आहे. क्रिशपाठोपाठ अभिनेता सोनू सूदनेदेखील हा चित्रपट सोडून दिला. कंगनाच्या सततच्या दिग्गदर्शनातल्या हस्तक्षेपाला वैतागून त्याने हा चित्रपट सोडून दिला असल्याचे त्याने माध्यमांना सांगितले. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on: November 30, 2018 9:46 AM
Exit mobile version