कंगनाचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा

कंगनाचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा

कंगनाचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा

आज मुंबई हायकोर्टात कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठीच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान पासपोर्ट प्राधिकरणाने हायकोर्टात याप्रकरणी नियमावलीनुसार लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता कंगनाचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह दिसत आहे.

यामुळे कंगनाचा पासपोर्ट नूतनीकरण्यासाठी अडकला

कंगनाला रनौतला धाकड चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी हंगेरी येथे जायचे आहे. परंतु तिचा पासपोर्ट नुतनीकरण होत नाही आहे. कारण कंगनाविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरणात गुन्हा दाखल आहे आणि पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. त्यामुळे अजूनही कंगनाच्या पासपोर्टचे नुतनीकरण करण्यात आले नाही, अशी माहिती कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी याचिकेद्वारे दिली आहे. आज याच याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायाधीश एस एस शिंदे आणि रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने कंगना रनौतची याचिका निकाली काढली.

कंगनाच्या पासपोर्टवर जलदीने सुनावणी घेण्याची हमी पारपत्र विभागाकडून मुंबई हायकोर्टात आज देण्यात आली. सुनावणी दरम्यान कोर्टात कंगनाच्या विरोधात कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही, असे कंगनाच्या वतीने मांडण्यात आले. तर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले की, पासपोर्ट अर्जावर कायद्यानुसार कायद्यानुसार शक्य होईल तितक्या लवकरात लवकर तोडगा काढू. याप्रकरणाचे लेखी विधान कंगनाच्या वकिलांनी दाखल केले असून अर्जात याची नोंद करण्याची हमी दिली आहे. हायकोर्टाने हे नोंदवून घेतले आहे.


हेही वाचा – लसीकरण जनजागृतीच्या १ मिनिटाच्या व्हिडिओत भाईजानचे १५ रिटेक


 

First Published on: June 28, 2021 7:51 PM
Exit mobile version