पासपोर्ट प्रकरण: वैतागलेल्या कंगनाने साधला आमिर खानवर निशाणा

पासपोर्ट प्रकरण: वैतागलेल्या कंगनाने साधला आमिर खानवर निशाणा

पासपोर्ट प्रकरण : वैतागलेल्या कंगनाने साधला आमिर खानवर निशाणा

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या हजर जवाबीपणामुळे तिला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा कंगनाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. काहि दिवसांपुर्वी कंगनाने केलेला देशद्रोहाचा आरोपामुळे ती पुरती फसली अल्याचे दिसतेय. कंगनावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरु असल्याने कंगनाच्या पासपोर्ट नुतणीकरणास प्राधिकरणाने नकार दिला आहे. या रागाच्या भरात तिने आमिर खानवर सद्या तोफ डागली आहे. आमिरने पुर्वी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचा ऊल्लेख करत, माझा पासपोर्ट रोखला आहे तसा आमिरचा का नाही रोखला? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. कंगनाने तिच्या इंन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत आमिर खानवर निशाणा साधला आहे. “आमिर खानने भारताला असहिष्णू म्हणत भाजपा सरकारचा अपमान केला पण त्यावेळेस कोणीही त्याच्या चित्रपटाची शूटिंग थांबवली नाही तसेच त्याचा पासपोर्ट नाकारला नाही. परंतू मला मात्र त्रास दिला जातोय. त्याज्याशी कोणीही वाद घातला नाही. महाविनाशकारी सरकारने मला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पासपोर्ट नुतणीकरणास नकार दिला . आणि कारण काय दिले तर टपोरी रोडसाइट रोमियोने माझ्याविरोधात देशद्रोहाची तक्रार केलीये म्हणे. चुकीची याचिका दाखल केली आहे.जर पासपोर्टची तारिख कालबाह्य होत आहे तर शेवटच्या क्षणी याचिका दाखल का केली ? असा आरोप लावत पासपोर्ट नुतनीकरण थांबवण्यात आले.” अशा आशयाची पोस्ट करत कंगनाने तिचा संताप व्यक्त केला आहे.

 

(Authority refuses to renew Kangana Ranaut’s passport due to treason charges) देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक लागण्याची किंवा त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूची मागणी करत कंगनाने पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. (kangana moves bobmbay high court to renew passport)बॉम्बे हायकोर्टाने कंगनाच्या याचिकेवर सुनावनी देत म्हंटले आहे की, अभिनेत्रीने चुकीची याचिका दाखल केली आहे.जर पासपोर्टची तारिख कालबाह्य होत आहे तर शेवटच्या क्षणी याचिका दाखल का केली ? यानंतर बॉम्बे हायकोर्टाने कंगनाला पुन्हा नविन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावनी 25 जूननंतर होणार असल्याचा निर्णय दिला आहे. मुद्दा कोणताही असो कंगना त्यावर भाष्य करणार नाही,हे शक्यच नाही.

2015 साली अभिनेत आमिर खानने देशात वाढत असलेल्या असहिष्णुततेच्या मुद्यावर भाष्य केले होते. मला आणि माझी पत्नी किरण आम्हां दोघांनाही मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशामध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो असे वक्तव्य केले होते. याचाच उल्लेख करत कंगनाने आमिर खानवर निशाणा साधला आहे.


हे हि वाचा – KKR11: सेटवरील स्पर्धक अनुष्का सेन कोरोना पॉझिटिव्ह

First Published on: June 17, 2021 12:15 PM
Exit mobile version