उद्या कपिल शर्माचे रिसेप्शन, सोशल मीडियावर शेअर केली पत्रिका

उद्या कपिल शर्माचे रिसेप्शन, सोशल मीडियावर शेअर केली पत्रिका

कपिल शर्मा आपल्या पत्नी सोबत

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माचे लग्न मागीलवर्षी झाले होते. लग्नानंतर आता त्याचे दुसऱ्यांदा रिसेप्शन होणार आहे. हे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले. या रिसेप्शनची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या रिसेप्श्नला पंप्रधान नरेंद्र मोदींही येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी रात्री ८ वाजता हे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. कपिल आणि गिन्नी यांनी १२ डिसेंबर रोजी पंजाबी पंरपरेने लग्न केलं होत. यानंतर २३ डिसेंबर रोजी त्यादोघांनी २३ डिसेंबर रोजी मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. या कार्यक्रमाला दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अनिल कपूर, करण जोहर या बरोबर अनेक कलाकार उपस्थित होते.

लग्नानंतर सुरु झाला शो 

कपील शर्माच्या लग्नानंतर त्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’ हा शो सुरु झाला. सध्या हा शो टीव्हीवर येत आहे. अभिनेता सलमान खान या शोचा प्रोड्युसर आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांनी आतापर्यंत उपस्थिती लावली होती. कपीलने दिल्ली येथे रिसेप्शन ठेऊन सर्वांना आमंत्रित केले आहे.

First Published on: February 1, 2019 1:13 PM
Exit mobile version