कमबॅकसाठी कपिल शर्माची जोरदार तयारी

कमबॅकसाठी कपिल शर्माची जोरदार तयारी

कपिल शर्माची कमबॅकसाठीची तयारी सुरु

सुनील ग्रोवरसोबतच्या काँन्ट्राव्हर्सीनंतर कॉमेडी किंग कपिल शर्माच्या करिअरचा ग्राफ जो खाली गेला तो वर आलाच नाही. याचा इतका परिणाम झाला की, त्याचा कपिल शर्मा शो बंद झाला. पण आता कपिल पुन्हा एकदा दिवाळीत कमबॅक करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. म्हणूनच की काय कपिल शर्मा आता तयारीला लागल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरी असलेल्या कपिल शर्माचे वजन वाढले असून सध्या तो वजन कमी करण्यासाठी जॉगिंग करत असल्याचे दिसले आहे. त्याचे हे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कपिल शर्मा शो’चा नवा सीझन येणार?

कपिल शर्मा शो चा नवा सीझन येत्या दिवाळीपासून सुरु होणार आहे. त्यासाठीच कपिल तयारी करत असल्याचे समजत आहे. काहीच दिवसांपूर्वी पापाराझींनी त्याला विमानतळावर घेरले होते. त्यावेळी त्याचे वजन खूपच वाढल्याचे दिसले.त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता तो कमबॅकच्या तयारीला लागला असून त्याचे जॉगिंगचे फोटो देखील समोर येत आहे.त्यामुळे हे नक्की की कपिल प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.

मानसिक स्थिती नव्हती ठीक

कपिल शर्मा शो बंद पडल्यानंतर कपिलने एका पत्रकाराला फोनवर शिवीगाळ केल्यानंतर तो पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला. पण त्यानंतर आलेल्या माहितीनुसार त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. यावर त्याने ईलाजदेखील सुरु केले होते. आता त्याची मानसिक स्थिती ठीक असून तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

(सौजन्य-filmibeat)

५ महिन्यांनी इन्स्टावर केली पोस्ट

कपिलचे इन्स्टावर जगभरातील ९६ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. शो बंद झाल्यानंतर तो या अकाऊंटवर फारसा अॅक्टिव्ह नव्हता. पण आता १९ ऑगस्टला त्याने त्याच्या K9 प्रोडक्शनच्या एका सिनेमाची माहिती देत लवकरच फर्स्ट लूक येईल, असे चाहत्यांना दिली आहे. आणि आता तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे.

 

First Published on: August 31, 2018 12:14 PM
Exit mobile version