आर. के. स्टुडिओतील गणपती बाप्पाचे दर्शन

आर. के. स्टुडिओतील गणपती बाप्पाचे दर्शन

आर. के. स्टुडिओत गणपतीची उत्सव (संग्रह चित्र)

हिंदी सिनेसृष्टीचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांनी बांधलेल्या आर. के. स्टुडिओमध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या सणाला सिनेजगतात विशेष लक्षवेधी ठरणारा सार्वजनिक गणपती म्हणजे मुंबईतील, चेंबूर येथील आर. के. स्टुडिओचा गणपती उत्सव हा आहे. या बाप्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आर. के. स्टुडिओत विराजमान होणारा हा अखेर गणपती उत्सव असू शकतो. काही दिवसांपूर्वीच कपूर कुटुंबियांनी आर. के. स्टुडिओ विकणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच आर. के. स्टुडिओच्या आठवणींमध्ये गणेशोत्सवाचा प्रामुख्याने समावेश केला जात आहे. त्यामुळे यंदा आर. के. स्टुडिओत बाप्पाचे शेवटचे दर्शन भाविक घेतील, असे म्हटले जात आहे.

बाप्पाच्या आरतीचा व्हिडिओ व्हायरल 

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाची आरती करताना, त्याची मनोभावे पूजा करतानाचे राज कपूर यांचे पुत्र रणधीर आणि राजीव कपूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. फिल्मी है बॉस या इंस्टाग्रामच्या हॅंडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

७० वर्षांचा आर. के. स्टुडिओ 

राज कपूर यांचा आर. के. स्टुडिओ सर्वांनाच परिचित आहे. हिंदी सिनेसृष्टीतील शो मॅन म्हणून ओळख असणाऱ्या राज कपूरने १९४५ साली हा स्टुडिओ बांधला होता. मात्र मागच्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी लागलेल्या आगीत चेंबूरमधील आरके स्टुडिओची फारच वाईट अवस्था झाली. दरम्यान यापूर्वी हा स्टुडिओ पुन्हा बांधण्यासाठी कपूर खानदान आणि अन्य बिल्डर्स यांची बोलणी सुरु होती. मात्र आता ७० वर्षीय हा जुना स्टुडिओ लवकरच विकण्यात येणार असल्याचं अभिनेता ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

First Published on: September 14, 2018 1:55 PM
Exit mobile version