करण जौहरने केली जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित सिनेमाची घोषणा

करण जौहरने केली जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित सिनेमाची घोषणा

करण जौहरने केली जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारीत सिनेमाची घोषणा

बॉलिवूड फिल्ममेकर करण जौहरने धर्मा प्रोड्शन अंतर्गत एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा एक कोर्टरुम ड्रामा असणार आहे. तसेच सी.शंकरन नायर यांच्यावर आधारित हा बायोपिक असणार आहे. याचदरम्यान सिनेमाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी. शंकरन नायर’ असे सिनेमाचे नाव ठरवण्यात आले आहे. सी शंकरन नायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड विरोधात ब्रिटश राजवटी विरोधात  कोर्टात धाव घेतली होती. करण जौहरने या सिनेमाबद्दल सोशल मीडियावरील सर्व अधिकृत अकाऊंटवर याची घोषणा करत एक पोस्ट शेअर केली आहे. “सी शंकरन नायर यांच्या अनटोल्ड स्टोरी सिनेमाबद्दल मी खूप उत्साहित आहे तसेच माझ्या मनात आदरयुक्त भावना जागृत झाल्या आहेत. हा सिनेमा करण सिंह त्यागी डायरेक्ट करणार आहे तसेच पुढील माहितीसाठी आमच्या सोबत राहा.” करण पुढे सिनेमाबद्दल लिहताना म्हणाला आहे की, हा सिनेमा पौराणिक कोर्ट कचेरीच्या वाद-विवादावर आधारित असणार आहे. शंकरन नायर जालियनवाला बाग हत्याकांडमधील घटणेचा पर्दाफाश करत ब्रिटिशांच्या विरोधात लढले होते. शंकरन नायर यांच्या बहादुरीने देशभरात स्वतंत्रता संग्रामला प्रज्वलित केलं आहे आणि खरेपणासाठी लढण्याची शक्ती तसेच इच्छाशक्तीला जन्म दिला आहे.
“द केस दॅट शूक द एम्पायर” पुस्तकावर आधारित हा सिनेमा हा चित्रपट सी शंकरन नायर यांची बायोपिक असणार आहे. तसेच हा सिनेमा खऱ्या आयुष्यातील घटणांवर प्रेरित असणार आहे आहे. या पुस्तकाला शंकरन नायर यांचे पणतू रघु पलत आणि त्यांची पत्नी पुष्पा पलत यांनी लिहले आहे.

 


हे हि वाचा –  अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतिचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन


First Published on: June 30, 2021 1:30 PM
Exit mobile version