लग्न अरमानचं, चर्चा तैमूरची!

लग्न अरमानचं, चर्चा तैमूरची!

सध्या कपूर घराण्यात लगीनघाई आहे. नुकताच अरमान जैन अनिसा मल्होत्राचा लग्न बंधनात अडकले. राज कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करिना, करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ लग्नबंधनात अडकणार आहे. अरमान जैन अनिसा मल्होत्राशी लग्न करणार आहे. सध्या घऱात मेहेंदी आणि संगीत कार्यक्रमाची धूम सुरू आहे. मात्र लग्न जरी आरमानच असलं तरी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमात पण करिना आणि सैफचा मुलगा लोकांचा फेव्हरेट स्टार किड तैमूरनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तैमूरच्या खास फोटोने सौशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे, लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमातील तैमुरचा आई करीनासोबतचा हा फोटो आहे. ‘इंडस्ट्रीतील सर्वांत ग्लॅमरस मायलेकाची जोडी’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोचं वर्णन केलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करीना पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये दिसत असून तैमुरने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. फोटोसाठी तैमुरने दिलेली पोझ पाहून अनेकांनी त्याला ‘भविष्यातील मॉडेल’ म्हणून कमेंट दिली आहे.

अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. गेल्या वर्षी कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत अरमानचा साखरपुडा पार पडला. अरमानने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

First Published on: February 4, 2020 8:40 AM
Exit mobile version