‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकीने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकीने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका

मराठी टेलिव्हिजनवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या मालिकेतील दिपा आणि कार्तिकच्या मुली दीपिका आणि कार्तिकी या दोघींनाही चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. या दोघींच्या गोड अभिनयाने मालिका सध्या जास्त प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.मात्र आता अशातच कार्तिकी ही भूमिका साकरणारी बालकलाकार साईशा भोईर आता या मालिकेतून बाहेर पडणार आहे. यामागचे कारणही आता स्पष्ट झालं आहे.

याकारणामुळे साईशाने सोडली मालिका
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकरणारी साईशा आता या मालिकेतून बाहेर पडणार आहे, याचं कारण म्हणजे साईशाला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे तिने ही मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात साईशा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

तसेच साईशा म्हणाली की, “मला खूप कंटाळा आला होता, आता मला शाळेत जायचे आहे. कार्तिकीला तुम्ही खूप प्रेम दिले, आता असेच प्रेम नव्या कार्तिकीला सुद्धा द्या”. असं साईशा म्हणाली.

First Published on: June 19, 2022 12:46 PM
Exit mobile version