‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचा १७ वर्षांनंतर रिमेक

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचा १७ वर्षांनंतर रिमेक

एरिका फर्नांडीस

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘कसौटी जिंदगी की’ चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ चा पहिला सीजन २००१ साली आला होता. या मालिकेत मिस्टर बजाज, अनुराग आणि प्रेरणा यांची लव स्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. आता तब्बल १७ वर्षांनी याचा रिकेम बनणार आहे. या रिमेकमध्ये ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकलेली एरिका फर्नांडीस प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या मालिकेसाठीचे प्रोमो शूट करण्यात आले असून यामध्ये एरिकाने प्रेरणाच्या भूमिकेतील काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. एरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रोमोशूटचे छायाचित्र शेअर केले आहेत. ‘कसौटी जिंदगी की’ ही एकता कपूर यांची मालिका तब्बल ९ वर्षे सुरू होती. आता नव्या सीजनमध्ये आणखी कोणते कलाकार या मालिकेत दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. मुख्य व्यक्तिरेखांसोबतच यामधील निगेटीव्ह भूमिका साकारणार्या उर्वशी ढोलकिया हिची कमोलिका ही भूमिकाही गाजली होती. आता नव्या सीजनमध्ये आणखी कोणते कलाकार या मालिकेत दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही

‘दिलबर…’ नंतर नोरा फतेहीचे आणखी एक सिझलिंग गाणं

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिच्या नुकत्याच आलेल्या ‘दिलबर दिलबर….’या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील दिलबर गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक लाइक्स आणि व्ह्युज या गाण्याला मिळाले असून नोराच्या डान्सचेही कौतुक होत आहे. ९० च्या दशकातील ‘सिर्फ तुम’ चित्रपटातील अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यावर चित्रीत झालेल्या गाण्याचे हे रिमेक आहे. नोरा फतेहीने दिलबर गाण्यात बेली डान्स केला आहे.नोरा आता आणखी एक सिझलिंग गाणं शूट करत आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत ‘स्त्री’’चित्रपटात नोरा राजकुमारसोबत एका भन्नाट गाण्यामध्ये दिसणार आहे. ‘स्त्री’ हा एक विनोदी- भयपट असून नोराने नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण भोपाळमध्ये केले आहे. गाण्यात राजकुमार राव देखील डान्स करताना दिसणार आहे. अत्यंत मजेशीर पद्धतीने या गाण्याचे चित्रीकरण झाले असून चित्रपटाच्या महत्त्वाच्या वळणावर हे गाणं दाखवण्यात येणार आहे.

First Published on: July 13, 2018 11:47 AM
Exit mobile version