खतरों के खिलाडी अर्जेंटिनाला रवाना

खतरों के खिलाडी अर्जेंटिनाला रवाना

सीझन ९ चे स्पर्धक

खतरों के खिलाडीचा आणखी एका सीझनचा थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यंदाचा हा सीझन अर्जेंटिनामध्ये होणार असून त्यासाठी ‘खिलाडी’ अर्जेंटिनाला रवाना झाले आहेत. गुरुवारी रात्री या सीझनचे स्पर्धक भारती, हर्ष, पुनित, विकास, शमिता आणि रिधिमा मुंबई एअरपोर्टवर दिसले.

 (सौजन्य- भारती सिंग इन्स्टाग्राम)

सीझन ९ ची उत्सुकता

खतरो के खिलाडीचा हा नववा सीझन आहे. प्रत्येक नवा सीझन हा आव्हानात्मक असतो. या नव्या सीझनचे शुटींग अर्जेंटिनाला होणार आहे. आता हा नवा सीझन कोणते नवे आव्हान घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सीझनचे होस्टिंग रोहित शेट्टी करणार असून या सीझनमध्येही खतरनाक स्टंटसोबतच इंटरटनेनिंग असणार हे मात्र नक्की!

यंदाचे खिलाडी

सीझन ९ मध्ये भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अभिनेत्री शमिता शेट्टी, कोरिओग्राफर पुनीत जे. पाठक, गायक आदित्य नारायण, टीव्ही अॅक्ट्रेस जास्मिन भसिन, रिधिमा पंडित, अविका गौर, विकास गुप्ता, झाईन इमाम, अॅली गोनी आणि बीग बॉस ११ ची स्पर्धक बंदागी कलारा असणार आहे.

 

First Published on: July 13, 2018 7:08 PM
Exit mobile version