किच्चा सुदीप आणि उपेंद्रच्या ‘कब्जा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

किच्चा सुदीप आणि उपेंद्रच्या ‘कब्जा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

कन्नड चित्रपट जगतामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेता यश, संजय दत्त आणि श्रीनिधी मुख्य भूमिकेत होते. आता अशातच अभिनेता किच्चा सुदीपच्या कब्जा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून कब्जाच्या टीझरमध्ये किच्चा सुदीपची धमाकेदार एन्ट्री दिसत आहे. कब्जाच्या जबरदस्त विजुअल्समध्ये एक वेगळं जग पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये एक महिला दोन मुलांसोबत चरखा चालवताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये तिरंगा फडकताना दिसत आहेत. या टीझरमध्ये अभिनेता उपेंद्रची सुद्धा धमाकेदार एन्ट्री दिसत आहे.

आर चंद्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून यामध्ये किच्चा सुदीप बरोबरच उपेंद्र राव आणि अभिनेत्री श्रेया सरन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.’कब्जा’ चित्रपटामध्ये 1942 ते 1984 या काळातील कथा दाखवण्यात आली आहे. ही एक कुख्यात गुंडाची कथा असून ही भूमिका उपेंद्र साकारणार आहे.

7 भाषांमध्ये होणार प्रदर्शित चित्रपट

‘कब्जा’ चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम सोबतच बंगाली आणि मराठी भाषेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.रम्यान, अजून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

 


हेही वाचा :

कृती सेननला आवडतो प्रभास? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

First Published on: September 18, 2022 3:31 PM
Exit mobile version