‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जीजस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता? मग लक्ष्मी बॉम्ब का?

‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जीजस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता? मग लक्ष्मी बॉम्ब का?

मुकेश खन्ना यांची टीका

शक्तीमानचे कलाकार मुकेश खन्ना हे आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोवर टीका करुन ते बरेच चर्चेत आले होते. कपिलचा शो वाह्यात असल्याची टीका त्यांनी केली होती. आता मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या आगाची चित्रपटाच्या शीर्षकावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी विस्तृत अशी इन्स्टा पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांतच अक्षय कुमार आणि कियारा अडवानी अभिनित लक्ष्मी बॉम्ब प्रदर्शित होणार आहे.

मुकेश खन्ना म्हणाले की, बॉलिवूडचे मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते हिंदुत्वाला नावे ठेवणारे चित्रपट तयार करतात. विशेषतः चित्रपटांच्या नावामध्ये हिंदूचा अवमान असतो. आता लोकांनीच यावर काहीतरी कारवाई करायला हवी, असेही खन्ना यांनी आपल्या पोस्टमधून सुचविले आहे.

मुकेश खन्ना यांची टीका

“लक्ष्मी बॉम्ब या नावाने चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा का? यावर संपुर्ण देशात वाद उफाळला आहे. काही लोक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर चित्रपटावर बंदी टाकणे योग्य नाही. कारण कुणीही चित्रपट पाहिलेला नाही. त्याचा फक्त ट्रेलर आलेला आहे. मात्र लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब लिहून थट्टा उडविल्यासारखे वाटत आहे. यामागे व्यावसायिक हेतू असू शकतो. काय तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीजस असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता का? उत्तर नाही असेल. मग लक्ष्मी बॉम्ब नाव कसे काय ठेवू शकता?”, असा सवाल खन्ना यांनी उपस्थित केला आहे.

आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी ते पुढे म्हणतात, “चित्रपट निर्माते अशी दृष्टता करतात कारण त्यांना माहित असते यावर वाद होणार. लोग ओरडतील. मग शांत बसतील. पण यातून चित्रपटाची फुकटात मार्केटिंग होणार. चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोक तुटून पडतील. असं काय आहे या चित्रपटात हे पाहायला. हेच होत आलंय आणि होत राहिल. हे कुठेतरी थांबवायला हवं आणि हे फक्त जनता जनार्दनच करु शकते.”

First Published on: October 28, 2020 11:54 PM
Exit mobile version