ललीत-205 चा रंगोत्सव

ललीत-205 चा रंगोत्सव

Lalit-205 Rangotsave

सण-उत्सव म्हणजे मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. ज्या दिवशी सण किंवा उत्सव त्या दिवशी त्या संदर्भातील काही कार्यक्रम पहायला मिळाला तर तो प्रेक्षकांना हवा असतो. यादृष्टीने चॅनलवाले फूल्ल तयारी करत असतात. अर्थात त्यासाठी पंधरा दिवस अगोदरच ही तयारी झालेली असते. स्टार प्रवाहवर ललीत-205 ही मालिका दाखवली जाते. होळी पेटवण्यापासून ते दुसर्‍या दिवशी रंग लावण्यापर्यंत जय्यत तयारी स्टुडिओमध्ये केली होती. या उत्सवात अभिनेते- अभिनेत्री स्वत: सहभागी असल्यामुळे तो खराखुरा कसा होईल हे त्यांनी पाहिलेले आहे. ते तुम्हालाही या मालिकेच्या निमित्ताने पहाता येईल.

जेवढी मालिका वर्षानुवर्षे चालते तेवढे सण- उत्सव त्यात पहायला मिळतात. काहींच्या बाबतीत तो पूर्वानुभव असतो तर काहींचा तो पहिलाच अनुभव असतो. गौरव घाणेकर हा नव्याने ललीत-205 मध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी मालिकेतली ही पहिली होळी असणार आहे. गमती-जमती, अनुभव, किस्से अशी बारा तासांची रंग उधळण इथे झालेली आहे. याच भागात आदित्यचे एक खास गुपित उलगडले जाणार आहे. या सर्व गोष्टी कथानकाचा एक भाग असला तरी कलाकारांनी उधळलेले रंग हे इको-फ्रेंडली आहेत हे महत्त्वाचे आहे.

First Published on: March 19, 2019 4:43 AM
Exit mobile version