कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नी ऑड्री डोल्हेन म्हणाली…

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नी ऑड्री डोल्हेन म्हणाली…

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येमुळे सेलेब्रेटीजगतात एकच खळबळ माजली होती. सर्व सामान्यांनाही एका सेलेब्रेटीच्या अशा आत्महत्येमुळे धक्का बसला. हातात काम नाही आणि त्यामुळे खासगी आयुष्यात वाढलेला ताण यामुळे कुशलने आत्महत्या केली. त्याने उचलेल्या टोकाच्या पावलामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. कुशलच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच त्याची बायको ऑड्री डोल्हेन हिने प्रतिक्रीया दिली आहे. “तो आमच्या नात्यात अपयशी ठरला”, असं म्हणत त्याच्या आत्महत्येसाठी मला जबाबदार का ठरवलं जावं असा सवाल केला आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बायको ऑड्री डोल्हेन म्हणाली, ” माझ्यावर टीका का होतेय हे मला माहित नाही. आमच्या नात्यात कुशल अपयशी ठरला. त्याला त्याला कुटुंबाचं गांभीर्य कळत नव्हतं. तो एक वडील म्हणूनही निष्काळजी होता. त्याच्या मुलाच्या भवितव्याचा त्याने कधीच विचार केला नव्हता. मी कियानला (मुलगा) कधीच त्याच्याशी बोलण्यापासून थांबवलं नव्हतं. कुशलला मी शांघायला येऊन आमच्यासोबत राहण्यास सांगितलं होतं पण त्यात त्याला कधीच रस नव्हता. माझ्याच खर्चावर आमचं घर चाललं होतं.”

कुशलने ‘लक्ष्य’,’सलाम-ए-इश्क’,’काल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’,‘इश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

First Published on: January 5, 2020 8:41 AM
Exit mobile version