मासिकासाठी लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

मासिकासाठी लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

अमेरिकेची प्रसिद्ध गायिका लेडी गागा हिचे जगभरात चाहते आहेत. नेहमीच लेडी गागाची स्टाईल तीचे चाहते कॉपी करत असतात. तीच्या गाण्यांचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. तीच्या शो ला ही तुफान गर्दी असते. पण ती तीच्या गाण्यांपेक्षा तीच्या स्टाईलमुळेच नेहमी चर्चेत असते. नुकतीच लेडी गागा पुन्हा चर्चेत आली आहे.

लेडी गागा हिने एका मासिकासाठी विवस्त्र फोटोशूट केले आहे. अर्धा माणूस आणि अर्धा रोबोट असं हे फोटोशूट आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लेडी गागाने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तीने मासिकाचे नाव कॅप्शन म्हणून दिले आहे. हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.

मासिकाच्या कव्हर स्टोरीवर लेडी गागा हिचा रोबोटीक फोटो लावण्याबाबत मासिकाने खुलासा केला आहे. आम्ही आर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही कोणत्याही प्रकारची पोर्नोग्राफी नाही असे मासिकाने स्पष्ट केले आहे. हे फोटो लेडी गागा हिच्या अगामी अल्बमचे असल्याचे म्हटले जात आहे.

First Published on: March 19, 2020 12:40 PM
Exit mobile version