टायटॅनिकच्या हिरोने व्यक्त केली दिल्लीच्या वायू प्रदूषण समस्येची चिंता

टायटॅनिकच्या हिरोने व्यक्त केली दिल्लीच्या वायू प्रदूषण समस्येची चिंता

हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ याने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीतील प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे. तर लिओनार्दोने दुसऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. त्याला ‘Extinction Rebellion’ असे म्हटले जाते. ही पोस्ट अनेक पर्यावरणीय समस्यांशी संबंधित असलेल्या संकटाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

याशिवाय दिल्लीतील इंडिया गेट याठिकाणी जाहीर निषेधाचे लिओनार्दो दि कॅप्रिओने अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. यापैकी काही फोटोमध्ये अनेक लोकांच्या हातात प्रदूषणाशी संबंधित फलक असल्याचे दिसतेय. त्यातील काही फलकावर “I want a better future” आणि “Breathing is killing me” अशी घोषवाक्य दिसताय. ” दिल्ली शहराच्या धोकादायक प्रदूषणाच्या पातळीवर त्वरित कारवाई करावी” या मागणीसाठी इंडिया गेट या ठिकाणी सुमारे १५०० लोकांनी निषेध केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ‘भारतातील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे १.५ मिलियन लोकांचा बळी गेला आहे. या समोर आलेल्या आकडेवारीनुसार वायू प्रदूषणामुळे बळी जाणाऱ्य़ा देशांत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.’ लिओनार्दो दि कॅप्रिओ याने पहिल्यांदाच भारतीय पर्यावरणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले नाही तर यापुर्वी देखील जूनमध्ये उद्भवलेल्या चेन्नईच्या पाणी टंचाईवर इन्स्टाग्रामवर आवाज उठवला होता.

First Published on: November 19, 2019 4:50 PM
Exit mobile version