ये बात! नेटफ्लिक्सवर ‘हे’ दहा चित्रपट होणार प्रदर्शित

ये बात! नेटफ्लिक्सवर ‘हे’ दहा चित्रपट होणार प्रदर्शित

Netflixवर पहा Behind the scene, नेटफ्लिक्सच्या युझर्ससाठी N-Plusचे खास सबस्क्रिप्शन

लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक सिनेमावाल्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. ओटीटीवर असलेली गरज लक्षात घेऊन या सिनेमाचा ट्रेलर, प्रोमो बनवण्यात आले होते. घरबसल्या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागली आहेत. अशात आता नेटफ्लिक्सवरही  १० सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

janhvi kapoor

हे आहेत ते १० चित्रपट

१. अनुराग बासू दिग्दर्शित लुडो- चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव अशी तगडी स्टार कास्ट आहे.

२. गुंजन सक्सेना – हा चित्रपट एअरफोर्समधील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुंजन सक्सेना यांनी कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

३. रात अकेली है – राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्धीकी आणि श्वेता त्रिपाटी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे.

४. इंदू की जवानी – कियारा अडवाणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

५. डॉली किट्टी और वोह चमकते सितारे – या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

६. याशिवाय अनुराग कश्यपचा एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

७. द गर्ल ऑन द ट्रेन – परिणीती चोप्रा या चित्रपटात दिसणारआहे

८. तोरबाज – संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

९. गिनी वेड्स सनी – विक्रांत मेस्सी आणि यामी गौतम चित्रपटात

१०. एके व्हर्सेस एके

हे दाह चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत. मात्र कोणता सिनेमा कधी प्रदर्शित होईल हे आज नेटफ्लिक्स जाहीर करणार आहे.

डिस्ने हॉटस्टारनेही सात सिनेमांची घोषणा केली. या वर्षासाठी तब्बल एक हजार कोटींची गुंतवणूक हॉटस्टार करणार असल्याचं समजत आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या सातही सिनेमांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरूवात २४ जुलैपासून होणार आहे. सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित दिल बेचारा या सिनेमापासून याची सुरूवात होणार आहे.


हे ही वाचा – बीग बी यांनी कविता करत सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार!


First Published on: July 16, 2020 8:51 AM
Exit mobile version