या बारा वर्षाच्या दिग्दर्शिकेच्या मुलीने स्वकमाईतून प्राण्यांसाठी दिले ७० हजार!

या बारा वर्षाच्या दिग्दर्शिकेच्या मुलीने स्वकमाईतून प्राण्यांसाठी दिले ७० हजार!

farah khan daughter

कोरोनाविरूध्द लढाई जिंकण्यासाठी देशातील व्यवसायीक असो किंवा कलाकार सगळेच सढळ हस्ते मदत करत आहेत. या दानशून लोकांच्या यादीत एका छोट्या मुलीच्या नावाची भर पडली आहे. दिग्दर्शिका फराह खान हिच्या १२ वर्षीची मुलगी आन्या हिने स्वकमाईचे ७० हजार रुपये देणगी म्हणून दिले आहेत. करोनामुळे भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी आन्याने ही रक्कम दिलीये. आन्याच्या या कामाचं सगळेच खूप कौतुक करत आहेत. फराहने अन्याचा व्हीडिओ शेअर करत ही माहिती दिली.

फराहने हा व्हीडिओ शेअर करताना लिहीले आहे की, “माझ्या १२ वर्षाच्या मुलीने आन्याने गेल्या पाच दिवसात पाळीव प्राण्यांची चित्र रेखाटून आणि प्रत्येक चित्र एक हजार रुपयांना विकून ७० हजार रुपये जमा केले आहेत. हे पैसे भटक्या आणि गरजू प्राण्यांसाठी वापरले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ही चित्रं ज्यांनी विकत घेतली त्या सर्वांचे आभार”

आन्याच्या या कामाचे बॉलिवूडच्या मंडळीने कौतुक केलं आहे. बर्‍याच सेलिब्रिटीनी ट्विटद्वारे प्रोत्साहन दिलंय आणि तिच्या कामाचं कौतुक केलंय. बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील खूप मदत केली आहे. अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची मदत केली आहे. तर अक्षय ने ३ कोटी पालिकेसाही दिले आहेत. त्याचप्रमाणे सलमान खानही गरजू व्यक्तींच्या मदतीला धावला आहे.


हे ही वाचा – लॉकडाऊनमध्ये रिेतेश- जेनेलियाच्या प्रेमाला ऊत, व्हीडिओ केला शेअर!


 

First Published on: April 14, 2020 12:09 AM
Exit mobile version