निवडणूक लढविणाऱ्या ‘या’ ७ कलाकारांचे भविष्य दावणीला

निवडणूक लढविणाऱ्या ‘या’ ७ कलाकारांचे भविष्य दावणीला

लोकसभा निवडणुकीचे ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर १९ मे रोजी सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या मतदानाचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी ‘रोड शो’ करुन जोरदार प्रचार केला. यावेळी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी देखील राजकारणात आपले नशीब आजमवले. जाणुन घेऊया या कलाकारांविषयी…

सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओलला भाजपने गुरूदासपुर या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी रविवारी होत आहे. गुरूदासपुर मधील मतदारसंघातून सनीच्या विरोधात कॉंग्रेसचे सुनील जाखड उभे असून २३ तारखेला त्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.

उर्मिला मातोंडकर

जेव्हापासून रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर राजकारणात उतरली आहे तेव्हापासून बॉलिवूड क्षेत्रातही तिच्या नावाच्या चर्चा होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत उर्मिला कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत आहे. कॉंग्रेस पक्षाने उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार म्हणून उभे केले आहे. यावेळी तिचा सामना भाजपाच्या गोपाल शेट्टींशी होणार आहे.

रवि किशन

भाजपने भोजपुरी आणि बॉलिवूड अभिनेता रवि किशन यांना गोरखपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात त्यांची लढत सपाचे उमेदवार रामभुआल निषाद यांच्यासोबत असणार आहे.

जया प्रदा

अभिनेत्री जया प्रदा देखील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. उत्तर प्रदेशातील रामपुरमधून सपाचे नेते आणि महाआघाडीचे उमेदवार आजम खानच्या विरोधात त्या निवडणुक लढवत आहेत.

हेमा मालिनी

अभिनेत्री हेमा मालिनी यंदा मथुरा मतदारसंघातून आपले नशीब आजमवणार आहेत. हेमा मालिनी यांनी २००४ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जयंत चौधरींना ३ लाख ३० हजारहून अधिक मतांनी हरवले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे.

मनोज तिवारी

भोजपुरी कलाकार मनोज तिवारी यांनी २००९ साली समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढवली होती. २०१४ साली भाजपने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यावेळी आपचे उमेदवार प्रो. आनंद कुमार यांना जवळपास सव्वा लाखाहून अधिक मतांनी मनोज तिवारी यांनी हरवले होते. यंदा पुन्हा एकदा ते निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.

निरहुआ

आजमगढ़चे भाजप उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआचे नशीब ही दावणीवर आहे. ते पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. निरहुआ उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.

First Published on: May 18, 2019 6:45 PM
Exit mobile version