Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया अडचणीत, सायबर सेलकडून समन्स

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया अडचणीत, सायबर सेलकडून समन्स

बेकायदेशीररीत्या आयपीएल मॅच स्ट्रीमिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाचं नाव समोर आलं आहे. फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहेत. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठा तोटा सहन करावा करावा. त्यामुळे समुहाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले आहेत. . तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर 29 एप्रिल रोजी हजर राहावं लागणार आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते.

न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, ‘महाराष्ट्र सायबरने फेअरप्ले ॲपवर IPL 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. या स्ट्रीमिंगमुले वायाकॉम कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे तिला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ती सायबर सेलच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास बांधील असेल.’

फेअरप्ले बेटिंग ॲप नेमकं आहे तरी काय?

फेअरप्ले हे एक बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून विविध प्रकारचे स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंटशी संबंधित जुगार खेळला जातो. या ॲपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फेअरप्लेवर क्रिकेट हा सर्वाधिक आवडता खेळ आहे, त्यानंतर फुटबॉल आणि टेनिस यांना लोकांची पसंती आहे. या सर्व खेळांचे सामने फेअरप्लेवर थेट प्रक्षेपित केले जातात, जेणेकरून ॲपवर खेळाडूला (सट्टेबाजी करणाऱ्याला) एकाच वेळी खेळही पाहता येईल आणि रक्कमही जिंकता येईल, असंही त्यात म्हटलंय.

फेअरप्ले ही ‘महादेव’ ऑनलाइन गेमिंग ॲपची उपकंपनी आहे. या ॲपवरही क्रिकेट, पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध खेळांवर बेकायदेशीरपणे सट्टेबाजी लावली जाते. गेल्या वर्षी हे ॲप प्रचंड चर्चेत आलं होतं. अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी या ॲपसाठी जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युएईमध्ये तब्बल 200 कोटी रुपये लग्नावर खर्च केल्यानंतर तपास यंत्रणांच्या रडावर ही ॲप आली होती. लग्नाच्या खर्चासाठी ही संपूर्ण रक्कम कॅशमध्ये देण्यात आली होती.

तमन्नाच्या आधी संजय दत्तची चौकशी झाली होती

तमन्नाला 29 एप्रिलला महाराष्ट्र सायबरसमोर हजर व्हावे लागणार आहे. या संदर्भात तमन्नापूर्वी अभिनेता संजय दत्तला 23 एप्रिल रोजी बोलावण्यात आले होते, मात्र तो त्यांच्यासमोर आला नाही. यासाठी संजय दत्तने आपले म्हणणे नोंदवण्यासाठी नवीन तारीख आणि वेळ मागितली आहे. कारण ज्या तारखेला संजय दत्तला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी बोलावले होते, त्या तारखेला तो भारतात नव्हता.

________________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

First Published on: April 25, 2024 11:48 AM
Exit mobile version