Prasad Oak : प्रसाद ओककडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला पार्टी

Prasad Oak : प्रसाद ओककडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला पार्टी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. गेल्या काही वर्षात या कार्यक्रमाने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून या कार्यक्रमाला स्वतःचा असा चाहता वर्ग मिळाला आहे. यातच प्रसाद ओक आणि हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमचं एक खास बॉण्डिंग आहे. वैयक्तिक आयुष्यात नवीन घर खरेदी करत अभिनेत्याने 2024 च्या सुरुवातीला सगळ्याच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. हास्यजत्रेची संपूर्ण टीम गेले काही दिवस प्रसादकडे त्याच्या नव्या घराची पार्टी मागत होती. अखेर या सगळ्यांनी एकत्र येऊन जंगी सेलिब्रेशन केल्याचं प्रसादने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी मिळून मुंबईत काही दिवसांपूर्वीच घर खरेदी केलं. त्यांच्या या नव्या घरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या टीमने खास उपस्थिती लावली होती. अमित फाळके, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, सचिन गोस्वामी, दत्तू मोरे, सचिन मोटे, समीर चौघुले, रोहित माने, निखिल बने, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर या सगळ्यांचा एकत्रित फोटो प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

First Published on: March 19, 2024 1:42 PM
Exit mobile version