दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर. संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिक ‘मेजर’ चित्रपटाचा टीजर झाला प्रकाशित

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर. संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिक ‘मेजर’ चित्रपटाचा टीजर झाला प्रकाशित

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर. संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिक ''मेजर' चित्रपटाचा टीजर झाला प्रकाशित

सध्या चित्रपटसृष्टीमधे बायोपिक सिनेमाचा ट्रेंड जोरदार सुरू आहे. अनेक राजयकिय,सिनेमाजगत,क्रीडा,कला क्षेत्राशी निगडीत असणार्‍या प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट प्रकाशित झाले आहेत. आता मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एका विरजवानाच्या जीवनावर आधारित ”मेजर” हा बायोपिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अभिनेता सलमान खानने या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला आहे. हिंदी व्यतिरिक्त तेलगू,तामिळ अशा तीन भाषांमध्ये चित्रपटाचा टीजर प्रकाशित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रची आर्थिक राजधानी असलेल शहर म्हणजे मुंबई. या मायानगरीत अनेक दहशदवादी हल्ले झाले. अनेक बॉम्बस्फोट,गॅंगवॉर हल्ले मुंबईवर करण्यात आले. पण आजपर्यंत 26/11 हा काळा दिवस कोणीही विसरू शकणार नाही. मुंबईच  नाही तर संपूर्ण भारत देशाला या हल्ल्याने हादरवून सोडले होते . या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढतांना भारतमातेचा सुपुत्र मेजर. संदीप उन्नीकृष्णन यांनी आपले प्राण पणाला लावले लढाईत त्यांना वीरमरण आले. आणि याच संपूर्ण घटनेचा तसेच मेजर.संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ”मेजर” हा चित्रपट २ जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे चित्रपट नेमका कोणत्या माध्यमावर म्हणजेच ओटीटी किंवा सिनेमागृहात प्रदर्शित करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांनी ‘मेजर’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शशी किरण यांनी चित्रपटाच दिग्दर्शिन केल आहे. तसेच प्रकाश राज, सई मांजरेकर, क्षोभिता धुलिपाला हे मुख्य कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.


हे हि वाचा – अनुप सोनी झळकणार ‘रात बाकी है’ या मर्डर मिस्ट्रीमध्ये

First Published on: April 13, 2021 3:13 PM
Exit mobile version