आता ‘मुन्नी’ पुन्हा होणार बदनाम!

आता ‘मुन्नी’ पुन्हा होणार बदनाम!

मलाईका अरोराचा ,जलवा

‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये’ असं म्हणत मुन्नी तर बदनाम झाली. पण तिने तिच्या डान्सने सगळ्यांना अक्षरश: वेड लावलं. आता ही मुन्नी पुन्हा बदनाम व्हायला आणि प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला तयार झाली आहे. ‘बिडी जलई ले’, ’नमक इश्क का’ अशा भन्नाट गाण्यांनंतर विशाल भारद्वाजने आपल्या ‘पटाखा’ या नवीन चित्रपटातील गाण्यासाठी मुन्नीची निवड केली आहे.

मुन्नी करतेय कमबॅक!

‘पटाखा’ या चित्रपटात ‘हॅलो हॅलो’ हे आयटम सॉंग आहे. या गाण्यात मलाइका अरोरा धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. ‘हॅलो हॅलो’ म्हणत मलाईका सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणार आहे. ‘मुन्नी बदनाम हुई’च्या अनेक वर्षांनंतर मलाईका ‘हॅलो हॅलो’ म्हणत कमबॅक करत आहे. गावातील एका जत्रेत मलाईकाचे ठुमके देणार आहे.

पटाखाचं पहिलं गाणं

‘पटाखा’ चित्रपटातील हे एकमेव गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं युट्यूबवर येताच खूप चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. ९ लाखाहून अधिक प्रेक्षकांनी हा व्हीडिओ बघितला आहे. गीतकार गुलजार यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत, तर रेखा भारद्वाज हिच्या आवाजात हे गाणं प्रेक्षकांना ऐकता येणार आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

First Published on: September 6, 2018 1:24 PM
Exit mobile version