Viral: मलायका अरोराची ‘ही’ योग मुद्रा पाहून नेटिझन्स झाले चकीत!

Viral: मलायका अरोराची ‘ही’ योग मुद्रा पाहून नेटिझन्स झाले चकीत!

बॉलीवूड अभिनेत्री मलाकया अरोरा तिच्या फिटनेस आणि वर्कआऊटसाठी नेहमीच चर्चेत राहते. वयाची ४० पार केलेल्या या अभिनेत्री व्यायाम आणि योगाच्या सहाय्याने आपली फिगर २० तल्या तरुणीलाही लाजवेल इतकी मेंन्टेन ठेवली आहे. संतुलित आहार आणि योग्य व्यायाम याचे सातत्य असल्यानेच आपल्याला हे शक्य झाले असल्याचे मलायकाने अनेकदा सांगितले आहे. नुकतेच मलायकाने तिची योगासनातील एक मुद्रा सोशल मीडियावर शेअर केली आहे. अत्यंत कठिण असे हे आसन मलायकाने केले असून सोबत कॅप्शनसुद्धा तिने दिले आहे. मलायकाने हलासन केले असून खुपच कठिण असे हे आसन आहे.

काय म्हणाली मलायका 

मलायका आपल्या चाहत्यांना म्हणाली की, तुम्हाला वाटले असेल मी अचानक कुठे गायब झाली. मात्र आपण स्वतःलाही वेळ खुप गरजेचे असते. तेच मी करत होते. फिटनेस, योगा आणि डाएट सोबतच मलायका तिच्या आणि बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमसंबंधांमुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. नेटिझन्सने अनेकदा त्यांना लग्नाच्या प्रश्नांवरूनही भेडसावून सोडले आहे. मात्र अद्याप लग्नाचा विचार नसल्याचे या दोघांनीही म्हटले आहे.

हेही वाचा –

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण; ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

First Published on: June 9, 2020 10:30 AM
Exit mobile version