मलायकाचे फोटो पाहून अर्जुनही चक्रावला; दिली ‘ही’ भन्नाट कमेंट

मलायकाचे फोटो पाहून अर्जुनही चक्रावला; दिली ‘ही’ भन्नाट कमेंट

बॉलिवूडची मलायका अरोरा खान नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अर्जून कपूरला डेट करतेय. या दोघांचे फोटो सोशलमिडीयावर नेहमी चर्चेत असतात. पण मलायका सध्या तीच्या खास फोटोंसाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलाइकाने नुकतच वोग इंडियासाठी फोटो शूट केलं. आणि हे फोटो सोशलमिडीयावर शेअर केले. मलायकाचा हा अंदाज बघून तीचे चाहते मात्र घायाळ झाले आहेत.

मलायकाने या वोगच्या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. या पांढऱ्या रंगामध्ये मलायकाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटसा पाऊस पडला आहे. पण यातील एक मेंट खूप खास आहे. मलायकाचे हे फोटो बघून अर्जून पण स्वत:ला थांबवू शकला नाहीये.

First Published on: September 26, 2019 7:26 PM
Exit mobile version