राजीव कपूर यांच्या निधनाने त्यांचे ९४ वर्षीय व्यवस्थापक भावनाविवश!

राजीव कपूर यांच्या निधनाने त्यांचे ९४ वर्षीय व्यवस्थापक भावनाविवश!

राजीव कपूर यांच्या निधनाने त्यांचे ९४ वर्षीय व्यवस्थापक भावनाविवश!

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राजीव कपूर यांच्या आकस्मिक निधनामुळं संपूर्ण बॅालिवूडवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी राजीव कपूर यांना तीव्र ह्दय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने बॅालिवूडसह कपूर कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.सोशल मी़डियावरही अनेक दिग्गज कलाकारांकडून राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आलीय. मात्र त्यांचे ‘आर के स्टुडीओ’चे व्यवस्थापक विश्व मेहरा ९४ वर्षीय वृद्ध असतानाही त्यांनी सोशल मीडियाचा आधार न घेता थेट त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कपूर कुटुंबीयांवर असणाऱ्या विश्व कर्मा यांच्या ह्दयस्पर्षी जीव्हाळ्याच्या प्रेमसंबंधाला पाहून चाहत्यांच्याही मनाला भुरळ पडली आहे. नात्यांची जपणूक कशी करायची,असा प्रेरणादायी संदेश त्यांनी कपूर यांच्या चाहत्यांना दिला आहे.

राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांना फिल्मी करिअरमध्ये अनेकदा चढ- उतार पाहायला मिळाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत त्यांना अभिनय क्षेत्रात चाहत्यांची वाहवा मिळाली नाही. राजीव कपूर यांचे काही सिनेमा प़डद्यावर गाजले नाहीत. परंतु त्यांच्य़ा वडिलांनी उभारलेल्या ‘आर के स्टुडिओ’त जाणं त्यांना नेहमीच आवडाय़चं.राज कपूर यांच्या खांद्याला खांदा लावून ‘आर के स्टुडिओ’त काम करुन सिनेमांमध्ये अभिनयाची छटा उमटवायची, असा निर्धारच राजीव यांचा होता. त्यामुळं स्टुडिओत काम करणारे सर्वच त्यांना कुटुंबातील सदस्यांसारखे प्रीय होते. मालक-नोकर असा भेदभाव त्यांनी कधीही केला नसेल, याचं जीवंत उदाहरण त्यांचे व्यवस्थापक विश्व मेहरा यांच्या भावनेतून प्रकट झालं आहे.

सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल!

हातात छडी, डोळे अश्रुधारांनी पानावलेले, कंबरेत शारिरीक वेदना सहन करत ९४ वर्षीय विश्व कर्मा यांनी राजीव कपूर यांना मनोभावे श्रद्धांजली वाहिली. त्यांना अशाप्रकारे भावनाविवश झालेले पाहून कपूर यांच्या चाहत्यांनाही खऱ्या नात्यातील गोडव्याची झलक पाहायला मिळाली. विश्व कर्मा यांच्या चेहऱ्यावरचे दुख:द भाव टीपण्यासाठी एका फोटोग्राफरचीही लगबग सुरु होती. त्याने टीपलेला कर्मा यांचा फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला.त्यानंतर कमेंट बॅाक्स मध्ये ‘मनाला भावनारा अप्रतिम फोटो’ अशा प्रतिक्रियांचा वर्षावच एकप्रकारे चाहत्यांनी केला आहे.

कपूर कुटुंबीयाचं स्नेहसंबंध जपणारे विश्व कर्मा!

विश्व कर्मा यांनी गेल्या तीन पीढ्यांपासून कपूर कुटुंबाचं संघर्ष पाहिलं आहे.राजीव यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्यावर शोककळा पसरलीय.विश्व कर्मा यांनी ‘आवारा’, ‘जब जब फूल खिले’ आणि ‘प्रेम ग्रंथ’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.ते राज कपूर,शम्मी कपूर यांचे मामा आहेत.

First Published on: February 10, 2021 1:08 PM
Exit mobile version