पाहा; मणिकर्णिकाचं पहिलं गाणं ‘विजयी भव’

पाहा; मणिकर्णिकाचं पहिलं गाणं ‘विजयी भव’

बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. त्यापाठोपाठ आता मणिकर्णिका… चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘विजयी भव:’ असे या गाण्याचे शब्द असून, आजच खास लाँचिंग सोहळ्यादरम्यान हे गाणं रिलीज करण्यात आलं. ‘विजयी भव’ या गाण्याला शंकर महादेवन यांनी आवाज दिला असून प्रसुन जोशी यांनी गाण्यातील शब्दरचना केली आहे. ‘विजयी भव’ मधील कंगना रणौतचा दमदार पण तितकाच हळवा अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालतो आहे. तर दुसरीकडे गायक शंकर महादेवन यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या आवजाने या गाण्यालाही ‘चार चांद’ लावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम लोक या गाण्याला पसंती दर्शवत आहेत. नुकतंच लाँच झालेलं हे गाणं युट्यूबर चांगलच व्हायरल होत आहे. पाहा, या गाण्याची एक झलक…

झाशीची राणी अर्थात राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात प्रेक्षकांना कंगना रणौतचा लढाऊ बाणा पाहायला मिळणार आहे.चित्रपटासाठी कंगनाने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. यामधील अनेक स्टंट कंगनाने स्वत: केले आहेत. युद्धभूमीवरील थरारक प्रसंग, मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाईचा प्रवास आणि देशासाठी प्राण पणाला लावण्याची भावना याची दमदार मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर मणिकर्णिकाच्या ट्रेलरमधील काही डायलॉग्ज सुपरहिट ठरत आहेत. ऐतिहासीक पार्श्वभूमी, युद्धभूमीतील थरार, एका मुलीचं, आईचं आणि राणीचं भावनिक कोंदण अशा सर्वच गोष्टींची गुंफण असलेला ‘मणिकर्णिका’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

First Published on: January 10, 2019 2:25 PM
Exit mobile version