मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून होणार विभक्त? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून होणार विभक्त? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईक तिच्या अभिनयाने आणि नृत्यांचे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. मानसीला ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हापासून मानसी विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, आता मानसी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसी तिचा पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून विभक्त होणार आहेत.

19 जानेवारी 2021 रोजी मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी अनेक दिवसांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2021 मध्ये दोघांनी मुंबईमझ्ये धुमधडाक्यात लग्न केलं. मात्र, आता दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इतकचं नव्हे तर मानसीने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. तसेच तिने अकाऊंटवरुन मानसी खरेरा हे आडनाव देखील काढलं आहे.

दरम्यान, मानसी आणि प्रदीपने अजून याबाबत कोणताही खुलासा केला नाही. तसेच बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबतचे फोटो देखील शेअर केलेले नाही. प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल आहे.

 


हेही वाचा :

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

First Published on: November 13, 2022 1:02 PM
Exit mobile version