Shocking: अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने केली आत्महत्या!

Shocking: अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने केली आत्महत्या!

mayuri deshmukh

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखला मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? या विषयी तो बोलत होता.

आशुतोष आणि मयुरी देशमुख २१ जानेवारी २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले होते. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेने मयुरीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.   मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस अशा काही चित्रपटात ती झळकली होती. आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे.

First Published on: July 29, 2020 7:39 PM
Exit mobile version