अजयच्या ‘तानाजी’ करिता ‘हा’ व्हिलन चेहरा बनणार मावळा

अजयच्या ‘तानाजी’ करिता ‘हा’ व्हिलन चेहरा बनणार मावळा

‘लकी’ चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता धैर्यशील आता थेट बॉलिवूड विश्वामध्ये झळकणार आहे. संजय जाधव ह्यांच्या ‘लकी’ चित्रपटामध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसलेला धैर्यशील आता अभिनेता अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटात अभिनय करणार आहे. आगामी अजयच्या ‘तानाजी’ या चित्रपटात धैर्यशील तानाजीच्या सैन्यातल्या मावळ्याच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धैर्यशील या चित्रपटात अभिनय करायला मिळाला ही एक मोठी संधी मानतो. धैर्यशीलने अवधूत गुप्तेच्या ‘एक तारा’ चित्रपटात काम केले असून ‘गोष्ट एका जप्तीची’, ‘एकाच ह्या जन्मी जणू’ ह्या टिव्ही मालिकेत देखील काम केले आहे.

ही मोठी संधी मिळाल्याबद्दल धैर्यशील असे म्हणाला की, “कोणत्याही अभिनेत्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम करणे, हे स्वप्नवत असते. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यावर मी मराठी नाटक, मालिका, शॉर्ट फिल्म आणि कमर्शिअल फिल्म्समध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारत गेलो. तेव्हा कधी ना कधी ग्लॅमरवर्ल्डमधल्या मोठ्या स्टार्ससोबतही आपण काम करावे अशी इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण होत आहे.”

तसेच, तानाजी विषयी विचारले असता “मी आत्ताच माझ्या भूमिकेविषयी जास्त बोलू शकत नाही. सध्या चित्रपटावर मेहनत घेत असून मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची इच्छा आहे.” असे धैर्यशीलने सांगितले.

First Published on: July 8, 2019 12:42 PM
Exit mobile version